इस देशका कुछ नही हो सकता

मी लेख लिहायला चालू केला तेव्हा टी व्ही वर बातमी चालू होती आमदार अनिल कदम यांनी महिलांना केलेल्या शिवीगाळीची आणि व्हाट्सॅप वर चर्चा चालू होती ती सगळे राज्यकर्ते कसे नाकर्ते आहेत याची. एकाने विचारले “देशासाठी तुम्ही काय करता?” दुस~याने लगेच उत्तर दिले “दर ५ वर्षांनी मतदान करतो”. “आणि नुसतं मतदान करणे पुरेसं आहे का? राजकारणात उतरून चांगला पर्याय देणे आणि हा नाकर्तेपणा दूर करणे आपले कर्तव्य नाही का?” लगेच सर्वांचे ठराविक साच्याचे आणि आपेक्षित उत्तर आले “ते आपले काम नाही. राजकारण्यांची मुले आहेत पुढच्या पिढीचे राजकारण सांभाळायला. आणि आपल्यासारख्या सुशिक्षीत लोकांचे काम नाही ते.” खरंच? राजकारण हे सुशिक्षित लोकांचे काम नाही? जर देशाचे धोरण ठरवायला सुशिक्षित लोक नसतील तर देशाचे धोरण आणि हा देश पुढे कसा जाणार?

का आजचे तरूण राजकारणापासून स्वतःला असे अलिप्त ठेवू इच्छितात? का इतके नैराश्यजनक वातावरण तयार होतोय? शरद पवार तरूण असताना त्यांनी असाच विचार केला होता का ? स्व. प्रमोद महाजन कोणती विरासत घेऊन राजकारणात आले? स्व. विलासराव देशमुख आपल्या तरूणपणात असेच राजकारणापासून अलिप्त राहिले असते तर आज आपल्या शहराचा इतका विकास झाला असता का? नरेंद्र मोदी इतक्या छोट्या गावाहून येऊन आज गुजरातचा इतका मोठा विकास करत आहेत हे शक्य अस्ते का जर तेव तरून वयात असेच राजकारणापासून दुर पळाले असते? आज आपल्या देशाची धोरणे तुम्हाला जर चुकीची वाटत असतील तर तुमचे कर्तव्य नाही का की देशाला नविन धोरणे देण्यासाठी पुढे यावे? या देशाला प्रगतीच्या नविन वाटेवर घेऊन जावे? की मग आपले काम आहे फक्त व्हाट्सॅपवर मॅसेज पाठवणे “ईस देशका कुछ नही हो सकता”.

पण शेवटी प्रत्येकजण स्वतःचे जग आधी सुरक्षित करणार. नाही का? घरचे पैसे खर्च करून समाजाचे काम करण्याइतका वेळ आणि पैसा आहे कुणाकडे? शिवाय जीवाची सुरक्षितता पण महत्वाची नाही का? या देशात डॉ नरेंद्र दाभोळकर सारख्या राजकारणापासून दुर राहणा~या समाजप्रेमी माणसाची जर हत्या होऊ शकते तर मग आपण राजकारणात पडून उगाच हजार जणांचा विरोध का घ्यावा हा सुद्धा विचार प्रत्येक तरून करणारच ना? शिवाय लाखोंची फ़िस (आणि तितक्याच लाखांचे डोनेशन) भरून मिळवलेले शिक्षण असेच वाया घालवायचे का? किमान शिक्षणासाठी केलेल्या या इन्व्हेस्टमेंटचे “रिटर्न्स” तरी यायला नको का? मग का उगाच या नसत्या भानगडीत पडायचे? ते राजकारणाचे काम मंत्र्यांच्या पोरांवर सोडावे. आपण मस्तपैकी एखादी गलेलट्ठ पगाराची विदेशी कंपनीमधील नौकरी पकडावी. अमेरीकेत, युरोपमध्ये किंवा दुस~या एखाद्या देशात जाऊन रहावे आणि फेसबुकवर स्टेटस टाकावे “कसमसे यार, इस देशका कुछ नही हो सकता”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>